गुहागर, ता. 18 : गुहागरतील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरात गुहागरतील पुरोहित वर्गातर्फे जनकल्याण याग करण्यात आला. मकर संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये या सर्व देवतांचा कृपाप्रसाद गुहागरवासीयांवर व्हावा, यासाठी या यागाचे आयोजन पुरोहित वर्गातर्फे करण्यात आले होते. Janakalyan Yag in Guhagar


गुहागरच्या ग्राम मंदिरात सात प्रमुख देवता आहेत. यात भैरी व्याघ्रंबरी, शंकर, विष्णू, भैरव, जोगेश्वरी, झोलाई, चंडिका, तसेच जय व विजय हे दोन द्वारपाल आहेत. या प्रत्येक देवतेच्या श्लोकाचा जप व त्या अनुषंगाने यज्ञामध्ये त्या त्या संखेत आहुती देण्यात आली. यावेळी गुहागरातील अनेक भक्तानी या दर्शनाचा लाभ घेतला. गुहागर शहरातील विविध देवस्थान अशा प्रकारचे याग पुरोहित वर्गातर्फे करण्यात येतात. Janakalyan Yag in Guhagar