महायुती टिका करत नाही, महाआघाडीच्या सभेत रंगतय नाट्य
गुहागर, ता. 01 : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुहागर मतदारसंघात महायुतीच्या दोन-तीन सभा पार पडल्या. या सभेत महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेणारे या मतदारसंघाचे आ. भास्करराव जाधव यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र, रविवारी हेदवी व गुहागर शहरात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेत रामदासभाई आ. भास्कर जाधव यांचा समाचार घेतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, सर्वांचीच घोर निराशा झाली. कारण, या सभेत ना शिवसेना नेते रामदासभाई कदम, ना भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी आ. जाधव यांच्या विरोधात एकही टीका टीपणी केली नाही. यामुळे कार्यकर्ते व पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला. आ. जाधव यांच्यावर टीका न करण्यामागे गुपित काही दडले आहे का, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. Is something behind Politics?
राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून 40 आमदार व 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. जिल्ह्यातील दोन आमदारांचाही यात समावेश होता. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. तेव्हापासून आक्रमक शैलीचे असलेले आ. जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संवाद यात्रेतून संपूर्ण राज्य ढवळून काढले. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकहाती शिंगावर घेतले. एकाही नेत्याला त्यांनी सोडले नाही. त्यांनी वेळोवेळी शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, गुहागर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये देखील त्याने त्यांच्यासह महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
महायुतीच्या सभांमध्येही सुरुवातीला रामदास कदम व डॉ. नातू यांनी जशास तसे उत्तर देत पलटवार केले. टीका टिपणीचा सामना अधिक रंगतदार होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु, गुहागर तालुक्यातील हेदवी व गुहागर रंगमंदिर येथील महायुतीच्या सभेत आ. जाधवांवर तटकरे, रामदासभाई व डॉ. नातू यांनी विरोधात एकही शब्द काढला नाही. हेदवी येथील सभेत केवळ भाजपचे डॅशिंग तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी आ. जाधवांचा खरपूस समाचार घेतला. Is something behind Politics?
याउलट महाविकास आघाडीच्या प्रचारसभांचा आढावा घेतला तर आबलोलीतील प्रचार सभेत आमदार जाधव, माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव व्यक्तिगत कारणांमुळे गैरहजर होते. पण आमदार जाधव नसल्याने या बैठकीला उपस्थिती देखील कमी होती. त्याचा उच्चार खुद्द उमेदवार अनंत गीते यांना द्यावी लागली. भवानी सभागृहात झालेल्या आघाडीच्या प्रचार सभेत काही कार्यकर्ते बोलले, एका मौलानांनीही आपले मत व्यक्त केले. तालुकाप्रमुख बोलले. परंतु जिल्हा प्रमुख सचिन कदम यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही. इतकेच नव्हेतर अनंत गीतेंच्या भाषणाचे वेळी त्यांना थांबवून आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भुमिकेबाबत वक्तव्य केले. वेळणेश्र्वरच्या सभेदरम्यान काही घटना घडल्या मात्र त्या समोर येऊ शकल्या नाहीत. Is something behind Politics?
महायुती आणि महाविकास आघाडींमधील या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिल्यानंतर पडद्यामागे काही शिजतयं का असा प्रश्र्न सध्या जनतेला पडतोय. याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडे चर्चा केली असता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात एखाद्यावर टिका करुन त्याचे महत्त्व का वाढवावे, त्यापेक्षा मोदीजींचे काम, महायुतीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यावर आमचा भर आहे. असे आमचे धोरण असल्याचे सांगण्यात आले. तर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणाला की, पडद्यामागे नव्हे जे घडले ते समोरासमोर घडले. आमदार जाधव यांच्या सुचनांप्रमाणे आम्ही सर्वजण आमच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गृहसंपर्क सुरु केला आहे. Is something behind Politics?
विदर्भाची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. अजुनही वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचार सभांसाठी जावे लागत आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच गुहागर मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विचार करुन प्रचाराचे नियोजन केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे काम सुरु आहे का यावर माझे बारीक लक्ष आहे. – आमदार भास्कर जाधव Is something behind Politics?