गुहागर उबाठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर यांची मागणी
गुहागर, ता. 22 : बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खासगी शाळांमध्ये मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुहागर तालुक्यातील सर्व शाळा व त्यांच्या आवारात सीसीटीव्ही कँमेरे बसवावे, अशी मागणी गुहागर उबाठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर यांनी केली. Install CCTV in schools


बदलापूर येथील घटनेने मुलींमध्ये सुरक्षितता वाटू लागली आहे. गुहागर तालुक्यातही शासकीय आणि खाजगी शाळा आहेत. यातील बहुतांशी शाळा या दुर्गम भागातील आहेत. या घटनेने मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने शासकीय व खाजगी अशा सर्वच शाळांमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही कँमेरे बसवून मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी विनंती सौं. ठाकूर यांनी केली आहे. Install CCTV in schools