मुंबई, ता. 26 : विजयदुर्गच्या खाडीत आयएनएस गुलदार युद्धनौकेचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. आयएनएस ‘गुलदार’ लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल आणि शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. स्वच्छतेनंतर, ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा ड्रायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी एमटीडीसी तीन ते चार पाणबुड्या विकत घेणार आहे. INS warship museum to be set up in Vijaydurg bay


भारतीय नौदलात ४० वर्षे सागरी सेवा दिलेल्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाने कारवार नौदल तळ, जिल्हा उत्तर कानडा येथे एमटीडीसीकडे हस्तांतरित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे ठिकाण मानल्या जाणार्या विजयदुर्ग खाडीत ही युद्धनौका बुडवण्यात येणार असून पर्यटकांना समुद्राच्या आतून पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. मराठ्यांच्या अधिसत्तेत तब्बल १०५ वर्षे राहिलेल्या किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊनच हा प्रकल्प येथे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. INS warship museum to be set up in Vijaydurg bay