परदेशी नागरिकांना वाटली मिठाई
गुहागर, ता. 19 : गेली दीड वर्ष महाराष्ट्रातील अनेक तरुण युरोपातील सलोवकीया याठिकाणी जाग्वार लँड रोवर कंपनीत कामासाठी आहेत. तेव्हापासून राज्यातील प्रत्येक सण साजरे करत असताना स्वातंत्र्यदिन देखिल त्याच पद्धतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या तरुणांनी आपल्या आनंदात परदेशी नागरिकांनाही सहभागी करून पेढे, जिलेबीचे वाटप केले. Independence Day celebrated in Europe
प्रत्येक भारतीयांसाठी १५ ऑगस्ट हा खूप खास आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाचे प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी केवळ आपला देशच स्वतंत्र झाला नाही तर या दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्याला आपले मूलभूत अधिकार मिळाले. हा दिवस देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करतो आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकराष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देतो. हा केवळ राष्ट्रीय सण नसून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या तन, मन आणि धनाने बलिदान दिले, त्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी भारत मातेचा जयजयकार करून संपूर्ण आसमंत दणाणून सोडला. त्यांच्या या उत्सवात जाग्वार लँड रोवर कंपनी व्यवस्थापन सहभागी झाले होते. तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या परदेशी नागरिकांना जिलेबीचे वाटप केले. Independence Day celebrated in Europe
जाग्वार लँड रोवर कंपनीत गुहागर तालुक्यातील निखिल रेवाले याच्यासह इतर जिल्ह्यातील ऋषी चव्हाण, निखिल बोराडे, तन्माई सुतार, ऋषी साळवी, रितेश शिगते, केतन सोनार, नितेश तुपे, राज सुर्वे, प्रशांत कोरडे आदीसह सुमारे 200 राज्यातील तरुणांनी एकत्र येऊन हा स्वातंत्र्यदिन साजरा केला. Independence Day celebrated in Europe