गुहागर पं. स. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ. जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थी असून त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मेडिकल कॉलेजचा कोल्हापूरच्या धर्तीवर रत्नागिरीचा कोटा वाढवून घेणार असल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग १५ वा वित्त आयोग अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गुहागर यांच्या सुसज्ज नुतन इमारतीचे उद्घाटनासाठी उपस्थित आमदार भास्कर जाधव बोलत होते. Inauguration of Guhagar Health Officer’s Office
प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते तर तालुका आरोग्य अधिकारी दालनाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी तर आरोग्य माहिती व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव,जि. प. माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, उबाठा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, गुहागर शहर प्रमुख विनायक जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, युवा शहर अध्यक्ष राज विखारे, गुहागर पं. स.चे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यार्थप्रकाश बळवंत तसेच सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Inauguration of Guhagar Health Officer’s Office


यावेळी बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, गुहागर नगरपंचायत होण्यासाठी सर्व पक्षातील लोकांना एकत्रित करून प्रयत्न केले. नगरपंचायतच्या निवडणुकीपूर्वी १९ कोटी रुपये नगरपंचायत मध्ये जमा केले. नगरपंचायत च्या माध्यमातून चांगले रस्ते, स्ट्रीट लाईट, प्रत्येक घरासमोर तसेच नागरिकांना जाण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले. जेवढ्या करण्यासारख्या गोष्टी होत्या तेवढ्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तळवळी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी पाच कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली. डायलेसिस सेंटर तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा अनेक सुविधा आरोग्य क्षेत्रामध्ये आपण केल्या असून यापुढेही नागरिकांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मी केला आहे यामुळे निवडणुका आल्यावर अनेक जण उमेदवारीसाठी या मतदारसंघात प्रयत्नशील असतात. महिला बचत गटासाठी रेल्वे स्टेशनवर स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न केले त्याला यशही आले. Inauguration of Guhagar Health Officer’s Office


तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या विविध सोयी सुविधा व उपचारांची माहिती दिली. गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोनच एमबीबीएस झालेले डॉक्टर असून या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा, यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. Inauguration of Guhagar Health Officer’s Office
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितलं की, मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदावर असताना असंख्य अडचणी असताना देखील आरोग्य विभागाला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र साठी ॲम्बुलन्सची सुविधा देण्याचे काम केले. पंधरावा वित्त आयोगातून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली असून यातून चांगली आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त केली. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले. Inauguration of Guhagar Health Officer’s Office