गुहागर, ता. 22 : राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा फाऊंडेशनच्या माध्यमातून श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर शाळेस महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. Image Gift to High School by Shivajna Foundation


श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर या शाळेतील ओम गंगावणे, स्नेहा मालप, निरंजन पाकळे व अन्य विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाऊंडेशनची स्थापना करून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात हातभार लावण्याचे काम केले जात आहे. महापूर, सुनामी यासारख्या संकटात या फाऊंडेशनने खारीचा वाटा उचलून आर्थिक मदत केली होती. अशा या फाऊंडेशनतर्फे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे यांच्याकडे महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या. मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी शिवाज्ञा फाऊंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. सुजाता कांबळे, मधुकर गंगावणे आदी उपस्थित होते. Image Gift to High School by Shivajna Foundation