कुमारिका पूजनातून बेटी बचावचा दिला संदेश
गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील श्री वराती मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त गोयथळे, मोरे, पाटील मंडळीच्यावतीने विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या स्त्रियांचा नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. तसेच अष्टमीचे दिवशी कुमारिका पूजन करुन मंडळातर्फे बेटी बचाव बेढी पढाव चा संदेशही देण्यात आला. Nari Shakti is honored in Guhagar Varati Temple


श्री वराती मंदिरामध्ये गोयथळे, मोरे पाटील मंडळींच्यावतीने शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2023 ते मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दररोज एका कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले. अपंगात्वावर मात करुन गुहागर तालुक्यात एच.पी. गॅसच्या वितरणाचा सेवा व्यवसाय करणाऱ्या यशस्वी उद्योजिका तसेच सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असणाऱ्या सौ. संगीता भाटकर यांचा कार्याचा गौरव वराती मंदिरात करण्यात आला. त्याचप्रमाणे गुहागर नगरपंचायतीच्या पहिल्या उपनगराध्यक्षा आणि पहिल्या महिला नगराध्यक्षा, विमा क्षेत्रात यशस्वी सौ. स्नेहा वरंडे यांचा सत्कार करण्यात आला. वराती देवस्थानमधील महिला कार्यकर्ता अनिता गोयथळे, सपना मोरे, मुग्धा मोरे, सुनेत्रा पाटील, गीता नार्वेकर यांच्या हस्ते, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन हे सत्कार करण्यात आले. Nari Shakti is honored in Guhagar Varati Temple


बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देण्यासाठी तसेच हिंदू संस्कृतीमध्ये कुमारिका, कुमारी, महिला यांना आपण देवीस्वरुप, मातृशक्ती स्वरुप मानतो. या आपल्या संस्कृतीचे स्मरण होण्यासाठी मंडळातर्फे कुमारिका पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. दहा कुमारीकांच्या पूजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात आरोही लोखंडे, मनवा लोखंडे, परी अभिजित मोरे, लावण्या धनावडे, कस्तुरी किरण रामाने ,आराध्या महेश बोले, अस्मि प्रभात खडपे आदी दहा कुमारिकांचे पूजन करण्यात आले. सतीश देवस्थळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कुमारिकांची विधिवत पूजा ग्रामस्थांनी केली. त्यानंतर कुमारिकांना भेटवस्तू देण्यात आली. Nari Shakti is honored in Guhagar Varati Temple


गोयथळे, मोरे, पाटील मंडळीच्यावतीने वराती देवी उत्सव कालावधीत आगळ्यावेगळ्या, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी वराती देवीचे दर्शन घेतले. तरी सर्व भाविकांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Nari Shakti is honored in Guhagar Varati Temple

