गुहागर, ता. 10 : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक 146 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धो धो कोसळलेल्या पावसाने घराच्या, गोठ्याच्या आणि बांध कोसळून नुकसानीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. Highest rainfall in Guhagar taluk
तालुका नियंत्रण कक्षाकडून ९ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे गुहागर तालुक्यात शहरातील ३ घरांमध्ये मध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लोकांना तसेच ५ घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्याने २३ लोकांना अशा एकूण ३३ लोकांना त्यांचे नातेवाईकांकडे स्थलांतरीत केले आहे. तसेच आरे गावातील नदीकाठावरील २ घरांमध्ये पाणी गेल्याने ४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
गोणवली येथे मिलिंद शंकर मोहिते यांच्या घरा जवळील बांध पावसामुळे कोसळून १० हजाराचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत भास्कर रोहीलकर यांचे घराचा बांध कोसळून सुमारे ५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत कौंढर काळसुर कार्यक्षेत्रातील विराज दत्ताराम खेडेकर यांच्या घराशेजारी असलेला कंपाउंड वॉलची भिंत अतिवृष्टीमध्ये कोसळून 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. Highest rainfall in Guhagar taluk
सोमवारी धोधो पावसामुळे आरे येथील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे वाहतूक सेवा काही काल बंद ठेवण्यात आली होती. या पुलावर पाण्यातून वाहून आलेली झाडे व कचरा पुलावर अडकला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अडकलेला सर्व कचरा काढण्यात आला. शृंगारतळी येथील फैमिदा इक्बाल ठाकूर यांच्या राहत्या घराची संरक्षण भिंत पडून तसेच पाईपलाईन फुटून अंदाजे २७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पाचेरी सडा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नं. 2 कवठेवाडी येथील बांध कोसळून ४० हजाराचे नुकसान झाले आहे. Highest rainfall in Guhagar taluk