गुहागर, ता. 05 : तालुक्यातील काजुर्ली येथे इ.10 वी मध्ये शिकत असलेली कु. तनुजा दिलीप हुमणे ( वय 15) हिच्या एका डोळ्यात कचरा गेल्याने त्या डोळ्याने दिसणे बंद झाले. तरी तनुजा हिच्या डोळ्यात लेन्स टाकण्यासाठी काजुर्ली ग्रामपंचायतच्या वतीने आर्थिक मदत बावीस हजार (22000) रूपयाची करण्यात आली. Help from Gram Panchayat to Tanuja


तनुजा हुमणे हिच्या घरची आर्थिक स्थिती खुप हलाकीची असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व खर्च उचलत तिला डोळ्यात लेन्स टाकण्यासाठी ग्रामपंचायत कडून आर्थिक मदत रू. बावीस हजार तिचे वडील दिलीप नथुराम हुमणे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीम.मेघना मोहिते, उपसरपंच सुधाकर गोणबरे, ग्रामपंचायत सदस्य नंदूकुमार धांगडे, सखी सावंत, ग्रामसेवक संजय गोरे, पोलीस पाटील सौ सिमा लिंगायत उपस्थित होते. Help from Gram Panchayat to Tanuja