• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नऊ उमेदवारांचे 11 अर्ज वैध

by Mayuresh Patnakar
October 31, 2024
in Politics
133 2
0
Assembly Elections
262
SHARES
749
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विक्रांत जाधव यांचाही अर्ज छाननीत बाद

गुहागर, ता. 31: गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज भरले होते यामध्ये चार उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद ठरले असून आता नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.  उमेदवारी अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये विक्रांत भास्कर जाधव (उद्धवसेना), दीपक केशव शिगवण (अपक्ष), सुनील सुधीर काते (अपक्ष), सादिक मुनिरोदिन काझी (अपक्ष) यांचा समावेश आहे. Guhagar Assembly Constituency

गुहागर विधानसभेसाठी 9 उमेदवारांचे 11 उमेदवार अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उद्धव सेनेकडून 2, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1, शिंदे सेना 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, आरपीआय (आठवले) 1 व अपक्ष 5 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उद्धव सेनेकडून भास्कर भाऊराव जाधव , शिंदेसनेकडून राजेश बेंडल, प्रमोद गांधी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हरी दिवा फडकले (अपक्ष) अजगनी तालुका खेड, प्रमोद सिताराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष)लोटे माळ चाळकेवाडी खेड, आर पी आय आठवले गटाकडून संदेश दयानंद मोहिते संतोष जैतापकर (अपक्ष ), सुनील सखाराम जाधव अपक्ष (जानवळे तालुका गुहागर, रामचंद्र गणपत पवार, धोपावे तालुका गुहागर (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. Guhagar Assembly Constituency

विक्रांत जाधव यांचा अर्ज का ठरला बाद

विक्रांत जाधव यांनी उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाकडून आमदार जाधव यांच्यासाठी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. आमदार भास्कर जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने विक्रांत जाधव यांचा डमी अर्ज बाद ठरला.  त्यामुळे  विक्रांत जाधव यांचा एबी फॉर्म वरील हक्क संपला. मग निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्याकडे अपक्ष उमेदवार म्हणून पाहिले गेले. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताना सुचकांची संख्या 10 असावी  लागते. तर नोंदणीकृत मान्यता प्राप्त पक्षाला केवळ एक सूचक चालतो. विक्रांत जाधव यांचा अर्ज अपक्ष म्हणून गृहीत धरल्यावर सुचकांची संख्या कमी पडली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. Guhagar Assembly Constituency

अपक्ष दीपक केशव शिगवण यांनी प्रतिज्ञापत्र दिले नाही. अपक्ष सुनील सुधीर काते यांनी प्रतिज्ञापत्र नोटरी किंवा सक्षम अधिकाऱ्यांसमोर केलेला नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. अपक्ष सादिक मुनिरुद्दीन काझी यांनी संभाजी ब्रिगेड तर्फे उमेदवारी अर्ज भरला संभाजी ब्रिगेड ही मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने उमेदवारी अर्ज भरताना दहा सूचक आवश्यक असतात ते न दिल्याने, अनामत रक्कम भरली नाही, प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकाऱ्यांसमोर केलेले नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. Guhagar Assembly Constituency

Tags: GuhagarGuhagar Assembly constituencyGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMLA Bhaskar JadhavMNSNews in GuhagarShiv SenaUpdates of GuhagarVikrant Jadhavआमदार भास्कर जाधवगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युजविक्रांत जाधवशिवसेना
Share105SendTweet66
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.