विक्रांत जाधव यांचाही अर्ज छाननीत बाद
गुहागर, ता. 31: गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज भरले होते यामध्ये चार उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद ठरले असून आता नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये विक्रांत भास्कर जाधव (उद्धवसेना), दीपक केशव शिगवण (अपक्ष), सुनील सुधीर काते (अपक्ष), सादिक मुनिरोदिन काझी (अपक्ष) यांचा समावेश आहे. Guhagar Assembly Constituency
गुहागर विधानसभेसाठी 9 उमेदवारांचे 11 उमेदवार अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उद्धव सेनेकडून 2, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1, शिंदे सेना 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, आरपीआय (आठवले) 1 व अपक्ष 5 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उद्धव सेनेकडून भास्कर भाऊराव जाधव , शिंदेसनेकडून राजेश बेंडल, प्रमोद गांधी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हरी दिवा फडकले (अपक्ष) अजगनी तालुका खेड, प्रमोद सिताराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष)लोटे माळ चाळकेवाडी खेड, आर पी आय आठवले गटाकडून संदेश दयानंद मोहिते संतोष जैतापकर (अपक्ष ), सुनील सखाराम जाधव अपक्ष (जानवळे तालुका गुहागर, रामचंद्र गणपत पवार, धोपावे तालुका गुहागर (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. Guhagar Assembly Constituency
विक्रांत जाधव यांचा अर्ज का ठरला बाद
विक्रांत जाधव यांनी उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाकडून आमदार जाधव यांच्यासाठी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. आमदार भास्कर जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने विक्रांत जाधव यांचा डमी अर्ज बाद ठरला. त्यामुळे विक्रांत जाधव यांचा एबी फॉर्म वरील हक्क संपला. मग निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्याकडे अपक्ष उमेदवार म्हणून पाहिले गेले. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताना सुचकांची संख्या 10 असावी लागते. तर नोंदणीकृत मान्यता प्राप्त पक्षाला केवळ एक सूचक चालतो. विक्रांत जाधव यांचा अर्ज अपक्ष म्हणून गृहीत धरल्यावर सुचकांची संख्या कमी पडली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. Guhagar Assembly Constituency
अपक्ष दीपक केशव शिगवण यांनी प्रतिज्ञापत्र दिले नाही. अपक्ष सुनील सुधीर काते यांनी प्रतिज्ञापत्र नोटरी किंवा सक्षम अधिकाऱ्यांसमोर केलेला नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. अपक्ष सादिक मुनिरुद्दीन काझी यांनी संभाजी ब्रिगेड तर्फे उमेदवारी अर्ज भरला संभाजी ब्रिगेड ही मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने उमेदवारी अर्ज भरताना दहा सूचक आवश्यक असतात ते न दिल्याने, अनामत रक्कम भरली नाही, प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकाऱ्यांसमोर केलेले नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. Guhagar Assembly Constituency