गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, चिपळूण तालुक्यातील बोरगावचे सरपंच, श्री कंट्रक्शनचे उद्योजक सुनील यशवंत हळदणकर यांना ईगल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गरुड झेप २०२४ पुरस्कार जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकेर यांनी नुकतीच ही घोषणा केली असून गुहागर तालुक्यात हळदणकर यांचे अभिनंदन होत आहे. फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त ९ जून रोजी सांगली वाळवा येथील कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. Garuda Zep Award to Sunil Haldankar
बोरगावचे सर्वात तरुण सरपंच पदावर असलेले सुनील हळदणकर यांनी आपल्या गावात असंख्य विकासकामे केली आहेत. श्री कन्ट्रक्शनच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगामध्येही ते कार्यरत आहेत. यातूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी रामपूर विभागात अनेक तरुणांना एकत्र करुन संघटना वाढीचे काम केले आहे. नवनवे उपक्रमही राबविले आहेत. कोरोना काळात गरीब, गरजूंना आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक, उद्योग व ग्रामविकास क्षेत्रातील कामाची विशेष दखल घेत ईगल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे. Garuda Zep Award to Sunil Haldankar