गुहागर, ता. 22 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहेत. शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा संपल्यानंतर पर्यटक दरवर्षी गुहागरात मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला हजारो पर्यटक येत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. Crowd of tourists in Guhagar
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतात. मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व यावर्षी उन्हाचा कडाका असल्याने मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटकांनी गुहागरकडे धाव घेतली आहे. पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक आता सलग तीन दिवस वास्तव्य करु लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधामूळे शक्य झाले आहे. Crowd of tourists in Guhagar
या सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. परचुरी खाडीमध्ये सत्यवान दर्देकर यांनी कोकणातील पहिलीच हाऊसबोट सुरू केली असून या सेवेला देखील पर्यटक पसंती देत आहेत. दाभोळ – धोपावे फेरीबोट, तवसाळ – जयगड फेरीबोटीबरोबरच डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी याच परचूरी खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आलेला पर्यटक केवळ गुहागर शहरामध्येच न राहता तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विखुरला गेला आहे. Crowd of tourists in Guhagar