खेड मध्ये तब्बल 26 लाखाची वीज चोरी!
रत्नागिरी, ता. 20 : गेल्या अनेक दिवसांपासून खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात असणाऱ्या मुळगाव या गावात डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जांभ्याच्या खाणी सुरू आहे. त्यातील रामचंद्र बुदर या खाण मालकाने कमर्शिअल मीटर मध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जांभा कट करण्यासाठी लागणारी मशीन वीज चोरी करून चालवण्यात आली. याबाबत गोपनीय माहिती महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्या सोबत जाऊन थेट मुळगाव येथील जांभा खाण येथे धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले. Biggest power theft in Konkan
महावितरणने त्यांना देण्यात आलेल्या दोन्ही मीटरमध्ये छेडछाड केल्याने नियमाप्रमाणे रामचंद्र बाबूजी बदर यांना हजारो युनिट चोरी करून वापरल्याबद्दल दोन बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामध्ये 13 लाख 34 हजार 390 तर दुसरे बिल 12 लाख 89 हजार 880 अशाप्रकारे 26 लाख 24 हजार 230 रुपयांचे वीज चोरी केल्याची बिल देण्यात आली आहे. तसेच त्यांनी ही रक्कम लवकरात लवकर भरायची आहे. महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने यासंदर्भात पंचनामा केला असून संबंधित खाण मालक रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावर पुढील काही दिवसात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Biggest power theft in Konkan
कोकणामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य
कोकणामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के आहे. येथील लोक प्रामाणिक वीज बिल भरतात त्यामुळेच मध्यंतरीच्या काळात देखील लोड शेडिंग पासून केंद्र सरकारने या जिल्ह्याला बहुतांशी वगळले होते. मात्र जांभा खाण मालकांच्या अधिक आर्थिक फायद्याच्या धोरणामुळे वीज चोरी सारखा हा प्रकार घडला असून संपूर्ण जिल्ह्यातील ही मोठी विज चोरी ठरली आहे. Biggest power theft in Konkan