खेडमध्ये अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद
रत्नागिरी, ता. 10 : खेड शहरातील नगरपरिषद कॉम्पलेक्स येथे गाळा नं 9 महालक्ष्मी सेल्स फर्निचर दुकानातुन लाकडी टेबल ड्रॉव्हरमधुन एका अज्ञात इसमाने 35 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना 6 डिसेंबर रोजी दुपारी 03.52 ते 04.00 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. Furniture shop theft


कमलेश मिश्रीमल जैन यांच्या मालकीचे असलेल्या महालक्ष्मी सेल्स या फर्निचर विक्री साहित्याच्या दुकानातून लाकडी टेबल ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले 35 हजार 600 रोख रक्कम चोरुन नेलेली असल्याचे सी. सी. टी. व्ही फुटेज मध्ये दिसत आहे. या प्रकरणी खेड पोलीस तपास करत आहेत. Furniture shop theft