• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शृंगारतळीत महिलेची छेडछाड

by Ganesh Dhanawade
December 7, 2024
in Guhagar
864 8
11
Teasing of woman in Sringaratli
1.7k
SHARES
4.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सहा तासात आरोपी गजाआड

गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून काही अंतरावर असणाऱ्या कौंढर काळसूर  रोडवरील शिगवणसडा शृंगारीमोहल्ला येथून धुनी भांडी व घरकाम करून कौंढर रस्त्याच्या मार्गे आपल्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या व डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घालून सफेद स्कुटी गाडीवरून आलेल्या इसमाने शेजारी गाडी उभी करून  महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून पलायन केल्याची घटना बुधवार दि. 4 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. Teasing of woman in Sringaratli

पीडित महिलेने तात्काळ गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिल्याने पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने  आरोपीला गुहागर येथुन अटक केली आहे. पीडित महिलेने गुहागर पोलीस स्टेशन येथे त्वरित गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना त्याला  पकडण्यात यश आले. Teasing of woman in Sringaratli

पोलिसांनी भा.द.वि.कलम ७४,७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी संकेत याला  अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हे. कॉ. श्री. नलावडे करत आहेत.  आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक भोपळे, पोलीस हवालदार वैभव चोगले, कुमार घोसाळकर, प्रितेश रहाटे, प्रथमेश कदम यांनी कामगिरी बजावली. Teasing of woman in Sringaratli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTeasing of woman in SringaratliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share678SendTweet424
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.