साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ ते ११ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत सोमवार ते गुरुवार दुपारी २ ते ५ या वेळेत, वेळणेश्वर भक्तनिवास येथे वर्ग घेतले जाणार आहेत. Free Sewing Class at Valneshwar
वेळणेश्वर परिसरातील पाच महिला बचत गटाच्या एकूण २५ महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. गरजू, मेहनती व शिवणाचा व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्यांनाच शिबिरात प्रवेश असून शिवण वर्ग मोफत आहे. मिहिका डिझायनर व क्लासेस, शृंगारतळी यांच्या संचालिका सौ. विनया विराग भोसले या शिवण वर्ग घेणार आहेत. ५ गावातील प्रत्येकी एका गरीब, होतकरू व शिबिरातील प्रगती पाहुन तिला इच्छा असल्यास शिलाई मशीन अर्ध्या किमतीत दिले जाणार आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी शरद जोशी 9869459804 यांचेकडे संपर्क करण्याचे आव्हान संस्थेने केले आहे. Free Sewing Class at Valneshwar