गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गुहागर, ता. 20 : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून एक महिन्यात दुप्पट रक्कम करण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख रूपये फसवणुक केल्याची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud with the lure of doubling up
गुहागर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीमध्ये फिर्यादी प्रतिश शंभु राजपुरे हा गुहागरमध्ये वरचापाट दुर्गादेवीवाडी खरे संकुलसमोर रहात असून ८ डिसेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२ या मुदतीत आरोपी नरेश भागोजी सणस, वय ३२, राहणार मांडवे, तालुका खेड याने फिर्यादी प्रतिश राजपुरे यांच्याजवळ फोनद्वारे संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन करत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून १ महिन्यात दुप्पट परतावा देतो याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून २१ लाख रूपये रोख स्वरूपात घेऊन मुदत संपूनही ती अदयाप परत केलेली नाही. अशी तक्रार करण्यात आली असून गुहागर पोलिसांनी नरेश भागोजी सणस याच्यावर भांद.वी. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Fraud with the lure of doubling up