गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर, आबलोली व पाचेरी सडा येथील जंगलमय भागात चालणाऱ्या गावठी दारू अड्डयांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. Guhagar police action on liquor business
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर ओझरवाडी येथे नदिकिनारी जंगलमय परिसरात चालणाऱ्या गावठी हातभट्टीवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत येथून ८ हजार ४०० रूपयाचा मुद्देल जप्त केला आहे. तर ६०० रूपये किंमतीची १० लिटर गावठी दारू मिळून आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस काँस्टेबल शैलेश वनगे यांनी फिर्याद दिली असून वेळणेश्वर येथील दिलीप शंकर ठाकूर, वय ४५ व ओमकार बंन्सीधर ठाकूर वय ६० या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५, ब, क, ड, फ, ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याचदिवशी आबलोली येथील चिरेखाणीच्या जंगलमय भागात झाडीझुडपाच्या आडोशाला गावठी दारू विकत असताना येथून ६०० रूपये किंमतीची १० लिटर गावठी दारू जप्त केली आहे, याप्रकरणी अनिल उर्फ गोटया हरिश्चंद्र रेपाळ, वय ५३, आबलोली कोष्टेवाडी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


तसेच गुहागर पोलिसांनी बुधवारी १७ जानेवारी रोजी पाचेरी सडा येथील जंगलमय भागात बोरीचे झाडाखाली गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असताना मिळून आली. येथून ६०० रूपये किंमतीची १० लिटर गावठी दारू मिळून आली. याप्रकरणी सचिन राजाराम गडदे, वय ४५ याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. Guhagar police action on liquor business