गुहागर, ता. 21 : श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन काळातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दि. 20 डिसेंबर रोजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देव वेळणेश्वर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष श्री नाना पोळेकर यांच्या शुभहस्ते व चतुर सीमा बांधवांच्या उपस्थितीत पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. Foundation laying program of Rameshwar temple


या मंदिराला एकूण 18 खांब आहेत. या खांबांचे भूमिपूजन 18 प्रमुख चतुर सीमा मांडवांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मध्ये मुख्य खांबाचे भूमिपूजन अध्यक्ष श्री नाना पोळेकर यांच्या हस्ते पार पडले. तर उर्वरित 17 खांबांचे भूमिपूजन श्री देव वेळणेश्वर देवस्थान विश्वस्त, सल्लागार तसेच देवस्थानचे पुजारी गुरव, गावचे प्रथम नागरिक, तसेच चतुर सीमा सहा विभागाचे सहा चतुर्थीमा बांधव, वेळणेश्वर व वाढदई चे गावकरी या सर्वांच्या शुभहस्ते प्रत्येक खांबाचे भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रम करण्यात आला. तसेच ठेकेदार यांच्या हस्ते एका खांबाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वेळणेश्वर गावातील चतुर सीमा बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विधी वर पूजा करणारे पुजारी ब्राह्मण यांच्याकडून विधी वर पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. Foundation laying program of Rameshwar temple