• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

by Guhagar News
December 27, 2024
in Bharat
106 1
0
Former Prime Minister Manmohan Singh is No More
208
SHARES
593
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवीदिल्ली, ता. 27 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात  आलं होतं. आपातकालीन विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या. Former Prime Minister Manmohan Singh is No More

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. डॉ.मनमोहन सिंग यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली. त्यांच्या शिक्षणाची आवडीने त्यांना पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणलं. Former Prime Minister Manmohan Singh is No More

1971 मध्ये मनमोहन सिंग भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवले, ज्याचे जगभरात कौतुक झाले. Former Prime Minister Manmohan Singh is No More

या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नवी दिशा दिली. डॉ.मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. त्यांनी 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले. Former Prime Minister Manmohan Singh is No More

Tags: Former Prime Minister Manmohan Singh is No MoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.