पंचायत समिती व ग्रामपंचायत जानवळेचा उपक्रम
गुहागर, ता. 26 : जानवळे, निगुंडळ, खामशेत, आबलोली, चिखलीसह विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1000 जांभूळ व 150 वडाच्या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी दिली. Forest festival program at Janwale
पंचायत समिती गुहागरच्या कृषी संजिवनी सप्ताहाच्या निमित्ताने वनमहोत्सवांतर्गत तालुक्यातील वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामपंचायत जानवळेच्या संयुक्त विद्यमाने जानवळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैकरवाडी ते बोरीचा माळ नवीन रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ व जांभूळ या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षवल्ली रोपवाटिका देवरुख व TWJ च्या माध्यमातून ही रोपे उपलब्ध करून देण्यात आली. Forest festival program at Janwale
यावेळी जानवळेच्या सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच मुबीन ठाकूर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, प्रतिक जाधव सर, ग्रा.पं.विस्तार अधिकारी शरद भांड, पं. समिती पाणीपुरवठा विभाग उप अभियंता मंदार छत्रे ग्रा.पं. सदस्य सेजल धामणस्कर, अनिल कोळंबेकर, सचिन कोळंबेकर, सुनिल जाधव, पराग धामणस्कर, ग्रामसेवक गोरखनाथ सोनवणे,आशा सेविका शिंदे, सर्व अधिकारी वर्ग, व सदस्य सौ सेजल धामणस्कर, अनिल कोळंबेकर, पोलीस पाटील संतोष जानवळकर, जानवळे सोसायटी सचिव अंतिम संसारे सर, रविंद्र इंदुलकर, TWJ सर्व टिम, ग्रा.पंचायत निवृत्त शिक्षक इंदुलकर, वनपाल एस.व्ही. परशेट्टी, वनरक्षक अरविंद मांडवकर, उदय बैकर, संतोष धामणस्कर, शैलेश आग्रे, अनिल रहाटे, सुशांत कोळ॔बेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भगवे, गणेश शिरगावकर, कर्मचारी, बचत गटातील महिलावर्ग, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, व विद्यार्थी उपस्थित होते. Forest festival program at Janwale