गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दहा विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून भाषणे केली. तसेच हर घर तिरंगा अंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी अर्णवी पुंडलिक नाटेकर हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Flag Hoisting at Veldur Nawanagar School
माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, ज्येष्ठ दिग्दर्शक संदीप वनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, उपाध्यक्ष संजना फुणगुसकर, प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व शाळेच्या प्रगती बद्दल गौरव उद्गार काढले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड मॅडम यांनी केले .तर आभार प्रदर्शन मुल्ला मॅडम यांनी केले. Flag Hoisting at Veldur Nawanagar School
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कोळथरकर, उपाध्यक्ष संजना फुणगुसकर, श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे नारायण रोहीलकर पाटील, विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर, वनकर वाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ दिग्दर्शक संदीप वनकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, रमेश रोहीलकर विश्वनाथ रोहिलकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, प्राजक्ता जांभारकर, सौ. जाधव, उदय रोहिलकर, विठोबा दाभोळकर, दिलीप पालशेतकर, सचिन रोहीलकर, रवींद्र जांभरकर, निशा आशा सेविका सोनाली वनकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, सर्व शिक्षक वृंद, जीवन जांभरकर, अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर, मत्स्यगंधा कोळथरकर, पोलीस पाटील अमोल वायंगणकर, तसेच मोहल्ला कमिटीचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक शिक्षक संघ सदस्य महिला मंडळ पदाधिकारी युवक मंडळ व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Flag Hoisting at Veldur Nawanagar School