मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा दौरा संपतो न संपतो तोपर्यंत पकडल्या 2 LED light मासेमारी नौका
गुहागर ता. 14 : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED light मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. Fisheries Department on ‘alert mode’
देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलने संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. LED मासेमारीवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ना. राणे यांच्या दौऱ्याचा इफ़ेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तत्काळ दिसून आला. मंत्र्यांचा दौरा संपतो न संपतो तोच मत्स्यव्यवसाय विभाग कामाला लागले आणि सोमवारचा रात्री 2 LED बोटींवर कारवाई करण्यात आली. Fisheries Department on ‘alert mode’


मत्स्यव्यवसाय विभागाची “रामभद्र” क्र. IND-MH-4-MM-5806 गस्ती नौका सोमवारी दि. 13/01/2025 रोजीच्या रात्री गस्त घालत असताना 11 सागरी मैलाचे दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका आढळून आल्या. त्यामध्ये नौका मालक अर्शद अ. लतिफ पावसकर यांच्या नौका साद माज, क्र. IND -MH-4-MM-3731 आणि नौका मालक लियाकत मस्तान यांच्या नौका सुभान सफवान, क्र. IND -MH-4-MM-998 या नौकांवर कारवाई करत दोन्ही नौकेवरील LED light व जनरेटर नौकेसहित जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही नौकेवरील एल.ई.डी.लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी रु. 10.00 लाख किंमत धरुन दोन नौकेवरील एकूण रु. 20.00 लाखाची मालमत्ता जप्त करणेत आली आहे. त्यांचेवर सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. Fisheries Department on ‘alert mode’
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री नितेश राणे यांचे आदेशाची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याने मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एल.ई.डी. लाईटचा वापर मासेमारीसाठी करु नये. अशाही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे. Fisheries Department on ‘alert mode’