• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शासकीय रुग्णालयात पहिले देहदान

by Manoj Bavdhankar
December 24, 2024
in Guhagar
187 2
0
First body donation in government hospital
368
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 :  शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल साठे व मुलगी छाया साठे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा, या इच्छेने दिवंगत साठे यांचा देह दान केला. त्यांनी 18 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात येऊन देहदानाचा संकल्प केला होता. First body donation in government hospital

देहदानाचे महत्व

शरीररचना शास्त्र विभागामध्ये आलेल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन यासाठी केला जातो. या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व विभागातील कर्मचारी यांनी देहदान व त्यानंतरची प्रकिया पूर्ण केली. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील सहकार्य मिळाले. अधिष्ठाता डॉ. रामानंद व डॉ. सय्यद यांनी देहदान संकल्प करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. First body donation in government hospital

Tags: First body donation in government hospitalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share147SendTweet92
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.