गुहागर, ता. 20 : तालुक्यात सतत पडत असणार्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णत: नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर घराचे अंदाजे रुपये १०००००/- नुकसान झाले असून इतर कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही. तसेच पोमेंडी येथील घडशीवाडीतील श्रीम. माधुरी मधुकर घडशी यांच्या राहत्या घराचे छप्पर सततच्या पावसाने कोसळले असून त्यांचे अंदाजे रुपये २५०००/- इतके नुकसान झाले. Finance in Guhagar


आरे येथील मोहित प्रसाद देवकर यांच्या राहत्या घराच्या पडवीवर माडाचे झाड पडून अंदाजे रक्कम रूपये १५०००/- झाले आहे. आबलोली येथील बौद्धवाडी-कोष्टीवाडी स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळल्याने सुमारे ३००००/- चे नुकसान झाले आहे. या सतत पडणार्या पावसाने रुपये १ लाख ७० हजार रु.ची वित्तहानी झाली आहे. Finance in Guhagar