गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात शैक्षणिक कार्यानिमित्त नुकतीच भेट दिली. या भेटीनिमित्त इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुकास्तरीय सर्वसाधारण ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Education Officer honored the students
पाटपन्हाळे विद्यालयातील इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुका सर्वसाधारण ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये कु. कुशल वैभवकुमार पवार याने सहावा क्रमांक व रत्नागिरी जिल्ह्यात ९४ वा क्रमांक तसेच कु.सिद्धार्थ अशोक पाष्टे याने तालुकास्तरीय सातवा क्रमांक व जिल्हास्तरीय १५५ वा क्रमांक संपादन केला आहे. तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुका सर्वसाधारण ग्रामीण यादीमध्ये कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक व रत्नागिरी जिल्हास्तरीय ५५ वा क्रमांक तसेच कु.मृण्मयी दत्ताराम जाधव हिने तालुकास्तरीय पाचवा क्रमांक व जिल्हास्तरीय ९४ वा क्रमांक संपादन केला आहे. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष अभिनंदन केले. Education Officer honored the students
यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी श्री. चौधरी, श्री.चौगुले, श्री. नाईक, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मंगेश गोरिवले, पाटपन्हाळे विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण, प्रा. श्री. एस. एस. मोरे, शिक्षक आर. एम. तोडकरी, एस. वाय. भिडे, एस.एम. आंबेकर, डी. एस. निंभोरे आदी उपस्थित होते. Education Officer honored the students