• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनची नजर

by Guhagar News
January 15, 2025
in Ratnagiri
417 5
0
Drones on the beach
820
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मत्स्यव्यवसाय विभागाची तीन नौकांवर कारवाई

रत्नागिरी, ता. 15 : जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये या दोन ठिकाणी जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत तीन नौकांवर कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.  जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण व नियंत्रण कक्षाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी  मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे हस्ते करण्यात आले होते. Drones on the beach

ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत समीर अ. गफूर वस्ता यांची “मोहम्मद सैफ” क्र.आयएनडी-एमएच-4-एमएम-676 ही नौका 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पध्दतीने अनधिकृत मासेमारी करताना आढळल्याने, श्रीम. जबीन कमाल होडेकर यांची “अल कादरी” क्र.आयएनडी-एमएच-4-एमएम-1635 नौका 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पध्दतीने अनधिकृत मासेमारी करतान व  इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची नौका “यासीर अली- II” क्र. आयएनडी-एमएच-4-एमएम-5962 विनिर्दिष्ट क्षेत्रात पर्ससिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याने नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. Drones on the beach

ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी मत्स्य विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याने मच्छिमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अंतर्गत कायद्यांतर्गत अटी शर्तीचा भंग करुन मासेमारी करु नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. Drones on the beach

Tags: Drones on the beachGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share328SendTweet205
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.