• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरकारला रिझर्व्ह बँकेकडून सर्वोच्च लाभांश मंजूर

by Guhagar News
May 24, 2024
in Bharat
159 2
0
Dividend from Reserve Bank to Govt
313
SHARES
893
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : दि. २२ मे रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश जाहीर केला. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०८ व्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. आरबीआयचा लाभांश हा पाच वर्षांतील सर्वोच्च आहे. सन २०१९ मध्ये, आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये अतिरिक्त हस्तांतरित केले होते. Dividend from Reserve Bank to Govt

‘सन २०१८-१९ ते २०२१-२२ या लेखा वर्षांमध्ये प्रचलित आर्थिक परिस्थिती व करोना महासाथीमुळे रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाचा आकार वाढण्यासाठी आणि एकूणच आर्थिक व्यवहारासाठी पाठबळ म्हणून आकस्मिक जोखीम संरक्षक कोष (सीआरबी) ५.५० टक्के राखण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. प्रत्यक्षात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सीआरबीचे प्रमाण सहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. तर, आर्थिक वर्ष सन २०२३-२४साठी सीआरबीचे प्रमाण ६.५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यानंतर मंडळाने २०२३-२४ च्या लेखा वर्षासाठी केंद्र सरकारला अतिरिक्त दोन लाख १० हजार ८७४ कोटी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली,’ असे रिझर्व्ह बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Dividend from Reserve Bank to Govt

विशेष म्हणजे, तुटीचे प्रमाण ५.१ टक्के या मर्यादित ठेवण्याचे हे लक्ष्य साधण्यासाठी ही भरीव लाभांश रक्कम केंद्र सरकारला साह्यभूत ठरेल. याशिवाय, सार्वत्रिक निवडणुकांच्या समाप्तीनंतर पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा नवीन सरकार सत्तेवर येईल तेव्हा ते कदाचित कर संकलनास पाठबळ देईल, त्यामुळे नवीन सरकारला अधिक खर्चाची लवचिकता मिळेल. Dividend from Reserve Bank to Govt

आरबीआय प्रत्येक आर्थिक वर्षात आकस्मिक पैशाचे वाटप करते. या तरतुदीचा उद्देश अनपेक्षित परिस्थिती, जसे की सुरक्षा मूल्य घसारा आणि प्रणालीगत समस्यांमधून उद्भवणारे धोके, चलनविषयक किंवा विनिमय दर धोरण मोहिमा आणि आरबीआयच्या विशेष दायित्वांना संबोधित करण्यासाठी आहे. आकस्मिक जोखीम बफर ५.५-६.५ टक्क्यांवर राखणे अपेक्षित आहे. रिझर्व्ह बँकेने सन २०२२-२३ या मागील आर्थिक वर्षात केंद्राला लाभांश रूपात ८७ जार ४१६ कोटी रुपये दिले आहेत. त्यात यंदा १४० कोटी रुपयांची वाढ झाली  आहे. Dividend from Reserve Bank to Govt

Tags: Dividend from Reserve Bank to GovtGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.