गुहागर, ता. 14 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दि. 16 जून २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा ता. गुहागर येथे आयोजित केलेला आहे. Distribution of Educational Material


तरी सर्व दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. शैक्षणिक साहित्याचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित असणे गरजेचे आहेत. तसेच कार्यक्रमासाठी येताना नुकतेच उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ( मार्कलिस्ट ) घेवून यावे. तसेच सदरची माहिती आपल्या आजूबाजूच्या गरजू विद्यार्थ्यांना सांगून त्यांना उपस्थित राहण्यास सांगावे.असे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत कळविण्यात येत आहे. Distribution of Educational Material