• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलिसांची डिझेल तस्करीची मोठी कारवाई

by Ganesh Dhanawade
November 18, 2024
in Guhagar
327 4
0
Diesel Smuggling in Anjanvel Beach
643
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नऊ जणांना घेतले ताब्यात; अंजनवेल समुद्रकिनारी 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत मोठी कारवाई करून यामध्ये 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. गुहागर मधील ही सर्वात मोठी डिझेल तस्करी करणारी कारवाई करण्यात आली आहे. Diesel Smuggling in Anjanvel Beach

गुहागर पोलीस अंजनवेल येथे गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. अंजनवेल जेटी किनारी रात्री 01 ते 03 या दरम्याने अवैध रित्या एका मच्छिमारी बोटीतुन जीवनावश्यक वस्तू, डिजेल टँकर मध्ये मोटर व पाईपच्या सहाय्याने 9 व्यक्ती अवैध रित्या डिझेल तस्करी करीत असताना मिळून आले. या डिझेल तस्करी करिता वापरण्यात आलेली, मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर  MH 46 BM 8457, बलेनो कार MH 46 BK 2568, मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य  याच्या सहाय्याने  25000 लिटर डिझेल तसेच आरोपीच्या ताब्यातील  नऊ मोबाईल गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण 2,05,95,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 9 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. Diesel Smuggling in Anjanvel Beach

सदर कारवाई चिपळूण चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्री ढेरे, गुहागर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व कर्मचारी, तालुका पुरवठा अधिकारी पेंडसे मॅडम यांनी केली. Diesel Smuggling in Anjanvel Beach

Tags: Diesel Smuggling in Anjanvel BeachGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share257SendTweet161
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.