नऊ जणांना घेतले ताब्यात; अंजनवेल समुद्रकिनारी 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत मोठी कारवाई करून यामध्ये 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. गुहागर मधील ही सर्वात मोठी डिझेल तस्करी करणारी कारवाई करण्यात आली आहे. Diesel Smuggling in Anjanvel Beach
गुहागर पोलीस अंजनवेल येथे गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. अंजनवेल जेटी किनारी रात्री 01 ते 03 या दरम्याने अवैध रित्या एका मच्छिमारी बोटीतुन जीवनावश्यक वस्तू, डिजेल टँकर मध्ये मोटर व पाईपच्या सहाय्याने 9 व्यक्ती अवैध रित्या डिझेल तस्करी करीत असताना मिळून आले. या डिझेल तस्करी करिता वापरण्यात आलेली, मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर MH 46 BM 8457, बलेनो कार MH 46 BK 2568, मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य याच्या सहाय्याने 25000 लिटर डिझेल तसेच आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण 2,05,95,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 9 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. Diesel Smuggling in Anjanvel Beach
सदर कारवाई चिपळूण चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्री ढेरे, गुहागर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व कर्मचारी, तालुका पुरवठा अधिकारी पेंडसे मॅडम यांनी केली. Diesel Smuggling in Anjanvel Beach