गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे तसेच खराब बाजूपट्टी, रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अनेक एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. खराब झालेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी श्रमदानाने केली असून या बंद करण्यात आलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने गुहागर एसटी आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. Demand to start closed ST rounds
विद्यार्थी व नागरिक यांनी यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात तक्रार केल्यानंतर मनसेच्यावतीने गुहागर आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून सदरच्या फेऱ्या सुरू करण्यास याव्या अशी विनंती केली, त्यानंतर अनेक फेऱ्या सुरु करण्यात आल्या असून अत्यंत खराब असलेल्या रस्त्यांवरती एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हे रस्ते सुस्थितीत झाल्यानंतर एसटी फेरी सुरू करण्यात येतील, असा विश्वास सोनाली कांबळे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, सुनील हळदणकर, सुजित गांधी, पत्रकार गणेश किरवे उपस्थित होते. Demand to start closed ST rounds