• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण, गुहागरच्या भूजल पातळीत घट

by Guhagar News
December 9, 2024
in Guhagar
294 3
0
Decrease in ground water level
577
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाची माहिती, विंधन विहिरींचा परिणाम

गुहागर, ता. 09 : वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वेळीरत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी ०.०७ मीटरने वाढलेली असली तरी या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील भूजलपातळी खालावलेली असल्याचा अहवाल या विभागाने जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेला दिला आहे. यामध्ये गुहागर, चिपळूण, दापोली, मंडणगड या तालुक्यांच्या भूजल पातळीत घट झाली आहे. Decrease in ground water level

राज्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मि.मी पावसाची नोंद होते. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढणार, अशी सर्वांची धारणा असते; परंतु अतिवृष्टीचा तसा भूजलपातळीवर थेट परिणाम होत नाही. त्यासाठी रेनहार्वेस्टिंग किंवा पाणी अडवा-पाणी जिरवा हे अभियान राबवणे आवश्यक असते, तरच भूजल पातळीत वाढ होते. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर ३ महिन्याला हा सर्व्हे होतो. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यांची पाणीपातळी मोजून त्यावर हा अंदाज बांधला जातो. Decrease in ground water level

गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी पाणीपातळी ३.०१ मीटर होती. यामध्ये सर्वांत कमी मंडणगड तालुक्याची ०.९७ मीटर पाणीपातळी होती तरगसर्वांत जास्त लांजा तालुक्याची ५.६२ मी. एवढी पाणीपातळी होती. त्यानंतरगउर्वरित तालुक्याची या दरम्यान पाणीपातळी होती. परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये २.९४ मी. एवढी आहे. जिल्ह्यातील गुहागर ०.६७ मी., मंडणगड ०.०५ मी., दापोली ०.०७ मी., चिपळूण ०.१० मी. या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. उर्वरित खेड तालुक्यात ०.११ मी., संगमेश्वर ०.२७ मी., रत्नागिरी ०.४७ मी., लांजा ०.३९ मी., राजापूर ०.३३ मीटरने भूजलपातळी वाढली आहे. Decrease in ground water level

गेल्या काही वर्षांमध्ये बोअरवेल मारण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारल्या गेल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार २०० फुटांपेक्षा जास्त खोलवर बोअरवेल मारता येत नाही; परंतु खासगी ठिकाणी मारल्या जाणाऱ्या बोअरवेल वेळी या निकषाची पायमल्ली केली जाते. त्याचा परिणामही भूजल पातळीवर होत आहे. Decrease in ground water level

Tags: Decrease in ground water levelGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share231SendTweet144
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.