• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तिरुपती बालाजी मंदिरात सहा भाविकांचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
January 10, 2025
in Maharashtra
192 2
0
Death of Devotees in Tirupati Balaji Temple
376
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं. Death of Devotees in Tirupati Balaji Temple

चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरुपती देवस्थान समितीने १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी वैकुंठद्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी १.२० लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता. Death of Devotees in Tirupati Balaji Temple

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. Death of Devotees in Tirupati Balaji Temple

तसेच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही सदर घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबाबत माझ्या संवेदना आहेत. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना मी करतो असंही जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे. Death of Devotees in Tirupati Balaji Temple

Tags: Death of Devotees in Tirupati Balaji TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.