• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ मुंबई एस.टी. बसला मध्यरात्री अपघात

by Guhagar News
January 14, 2025
in Ratnagiri
429 5
0
Dabhol Mumbai ST Bus Accident
844
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

रत्नागिरी. ता. 14 : दापोली येथून सुटलेली दाभोळ ते मुंबई या बसला मंडणगडजवळ शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरण ठिकाणी रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने यातील ४१ प्रवासी सुखरूप बचावले आहेत. झाडावर ही बस आदळल्याने हा भीषण अपघात टळला आहे. मात्र यावेळी आपत्कालीन संपर्क यंत्रणांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. बस उलटलेली पाहून या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी व अन्य काही मंडणगड येथील नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने प्रवासी सुखरूप बचावले आहेत. यावेळी गाडीमध्ये ४१ प्रवासी प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. Dabhol Mumbai ST Bus Accident

दापोली आगाराची गाडी (क्र. एम.एच.१४ बि.टी. २२६५) दापोलीहून मुंबईकडे जात होती. गाडीचे चालक व्हि.एस. गावडे हे गाडी घेवुन मंडणगड मधून मुंबईकडे रवाना झाले असता शेनाळे घाटात चिंचाळी धरणा जवळ गाडी रस्ता सोडून सूमारे १५ फुट बाजुला पलटी झाली. यावेळी समोर असलेल्या झाडाला एस.टी अडकल्याने गाडीतील सुमारे ४१ प्रवाशांचे प्राण वाचले. गाडी झाडाला अडकली नसती तर ती खोल दरीतील धरणामध्ये थेट कोसळली असती. Dabhol Mumbai ST Bus Accident

अपघातामध्ये दापोली तालुक्यातील सर्व प्रवासी होते. त्यांना सुखरुप गाडी बाहेर काढून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात घडताच आसपासच्या परिसरातील लोकांनी तसेच गाडीतील काही तरुणांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी प्रवाशांना मंडणगड ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. Dabhol Mumbai ST Bus Accident

Tags: Dabhol Mumbai ST Bus AccidentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share338SendTweet211
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.