• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ सायकल फेरी

by Guhagar News
December 2, 2023
in Ratnagiri
58 0
0
Cycle round for the promotion of persons with disabilities
113
SHARES
324
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली सायकलिंग क्लबतर्फे ३ डिसेंबर रोजी आयोजन

गुहागर, ता . 02 : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन केले आहे. Cycle round for the promotion of persons with disabilities

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून ७:३० वाजता सुरु होईल. ती उदयनगर, लष्करवाडी, बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव, बर्वे आळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय, आझाद मैदान अशा ६ किमीच्या मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव आणि इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय येथे जाऊन शाळेबद्दल, तिथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती करुन घेण्यात येईल. आपल्यातले काहीजण शरीराने धडधाकट असूनही नेहमी रडत असतात किंवा नाराज असतात. याउलट काही दिव्यांग व्यक्ती अपंगत्वावर मात करुन यशस्वीपणे सुखी समाधानी जीवन जगत आहेत. हे जाणून घेण्यासाठी आणि जन्मतः शारीरिक, मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायकल फेरी असेल. सहानुभूती नको, फक्त विश्वास दाखवा ही त्यांची माफक अपेक्षा असते. Cycle round for the promotion of persons with disabilities

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६,  ८३०८३६६३६६ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle round for the promotion of persons with disabilities

Tags: Cycle round for the promotion of persons with disabilitiesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.