गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 6 व 7 डिसेंबर रोजी श्री शिवछत्रपती महाराज स्टेडियम बालेवाडी पुणे येथे सबज्युनियर गट राज्य जुदो स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड नुकतीच गुहागर येथे करण्यात आली. Teams announced for State Subjunior Tournament


राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात सोहम महेश सुर्वे, ओम सुनील जंगम, वरद सुधिर चव्हाण, सर्वेश समिर डिंगणकर, आर्यन गणेश महाडिक, पायल अजय चव्हाण, नीरजा विकास निमकर, जान्हवी सूर्यकांत जाधव यांची निवड झाली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून रूतिकेश झगडे व संजना निवाते हे काम पहाणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष श्री. निलेश गोयथळे, उपाध्यक्ष श्री. गणेश धनावडे, सोनाली वरंडे, समिर पवार यांनी शुभेच्छा दिल्या. Teams announced for State Subjunior Tournament