• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीतील जलस्त्रोत दूषित

by Guhagar News
March 28, 2025
in Guhagar
207 2
0
Contaminated water source in Shringaratali
406
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दंडात्मक कारवाईचा इशारा

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाटाजवळील नाल्यात सांडपाणी सोडणार्‍या एकूण ३८ व्यवसायिक व रहिवाशांना पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने गुरुवारी नोटीसा दिल्या आहेत. नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी तातडीने पूर्णतः थांबवावे व त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नोटीसीतून करण्यात आल्या असून अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. Contaminated water source in Shringaratali

शृंगारतळी, जानवळे परिसरात गेले महिनाभर जलस्त्रोत दूषितचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. नदीच्या किनारी असलेले रहिवाशी, व्यवसायिक यांच्याकडून सांडपाणी नदीत सोडल्याने इतर नागरिकांचे पाणवठे दूषित झाले आहेत. ग्रामपंचायतीकडे याविरोधात तक्रारी गेल्या होत्या. अखेर ग्रामपंचायतीने गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांकडून कायदेशीर कारवाईबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, गटविकास अधिकार्‍यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४५ पो.क.३ व ग्रामसूची-१ अ नुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे पत्र दिले आहे. त्या संदर्भ पत्राला अनुसरुन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने एकूण ३८ जणांना नोटीसा पाठविल्या आहेत. Contaminated water source in Shringaratali

या नोटीसीत म्हटले आहे की, यापूर्वी सदर प्रकार थांबविण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. परंतु आपणाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले असून हे वर्तन ग्रामपंचायत कायदा तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन असून तुमच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले आहे. सदर नोटीस प्राप्त होताच आपल्याकडून घरातून नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी तातडीने पूर्णतः थांबवावे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे सूचित केले आहे. Contaminated water source in Shringaratali

Tags: Contaminated water source in ShringarataliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet102
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.