योजना राबविण्यासाठी महिलां भगिनुनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करावा – निलेश सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष गुहागर
गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची *मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण* योजना सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी, अमलात आणण्यासाठी आणि त्या योजनेचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी सर्व महिला भगिनींनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे तातडीने संपर्क करावा. असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले आहे. CM – My beloved sister
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता *मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण* ही योजना सुरू करण्यास दिनांक 28 जून 2024 रोजी मान्यता दिली आहे. यामध्ये पात्र आणि अपात्र लाभार्थींसाठी निकष आहेत. त्याचबरोबर पात्र लाभार्थीने काय निकष पूर्ण करावेत याची सुद्धा माहिती दिलेली आहे. या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आपण त्यामध्ये परिपूर्ण आहोत ना याची खात्री त्या त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविका करणार आहेत. तरी याबाबतचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कोणतीही धांदळ न करता त्याआधी आपली सर्व कागदपत्रे आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडून तपासून घेणे गरजेचे आहे, त्यांचा कागदपत्र परिपूर्ण असल्याचा होकार आल्यानंतरच या संबंधातले ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै असली तरी यामध्ये खात्रीने वाढ होणार आहे. त्यामुळे घाईगडबडीने, धांदळीने अर्ज सादर करून त्यामध्ये त्रुटी ठेवण्यापेक्षा सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे सर्व कागदपत्रे सादर करून त्यांचा होकार आल्यानंतरच आपण या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. या संदर्भात ग्रामपंचायतीमध्येही अर्ज सादर केल्यानंतर किंवा सादर करण्यापूर्वी खास महिलांसाठी सभा आयोजित करण्यात येणार आहे. CM – My beloved sister
तरी सर्व निकषांची पूर्तता करून, अंगणवाडी सेविकांजवळ संपर्क करून गुहागर तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी या योजनेचा लाभ करून घ्यावा.असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी केले आहे. या योजनेची परिपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी, ती कशाप्रकारे राबवली जाणार आहे याची माहिती घेण्यासाठी गुहागर तालुका एकात्मिक बालविकास कार्यालयाकडे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष अभय भाटकर,तालुका सरचिटणीस सचिन ओक, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, संदीप हळदणकर हेदवी उपसरपंच एकनाथ बसणकर यांनी भेट दिली. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका महाडिक मॅडम आणि हळये मॅडम यांनी आवश्यक आणि योग्य ती माहिती या सर्वांना दिली आणि ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी गुहागर तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नियोजन पुर्ण काम करणार असल्याचे यांनी सांगितले. CM – My beloved sister