रत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यात चार लाख ६० हजारांहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. CM My Beloved Sister Yojana
पालकमंत्री श्री. सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींसह प्रांताधिकारी, तहसीलदार सहभागी झाले होते. यावेळी श्री. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सर्वांनी पारदर्शकपणे काम करावे. लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. तालुकानिहाय, गावनिहाय शिबिरे आयोजित करुन, शिबिरामध्येच योजना मार्गी लावा. जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार महिलांना लाभ देऊन राज्यात आदर्श निर्माण करा. जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर ठेवा. CM My Beloved Sister Yojana


ते पुढे म्हणाले, या योजनेसंदर्भात राज्यात तीन तलाठी दोषी आढळले आहेत त्यामुळे एकाही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही याबाबत सर्वांना सूचना द्यावी. कोणी सापडलाच तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करू. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. मंडप आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. तलाठी, सर्कल, तहसीलदार या सर्वांनीच या योजनेला प्राधान्य देऊन पारदर्शक काम करावे. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी याबाबत नियोजन आणि सद्यःस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. CM My Beloved Sister Yojana