पाचवीतील एक तर आठवीतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत
गुहागर, ता. 05 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती एक विद्यार्थी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी गुणवंत यादीत झळकले आहेत. तर आर्या मंदार गोयथळे ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुक्यात प्रथम आली आहे. Success of Guhagar High School in Scholarship Exam


इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 30 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाला होता. या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. त्यामध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवी मधून शौनक दीक्षित हा एकमेव विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला आहे. तर इयत्ता आठवी मधून आर्या मंदार गोयथळे गुहागर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात १२वी, विवेक बाणे जिल्ह्यात १८ वा , रेईशा चौगुले जिल्ह्यात ४१ वी या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी स्थान पटकावले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, मधुकर गंगावणे, वैभव ढोणे, जयश्री बाणे, कृपाल परचुरे, सुजाता कांबळे, सुचिता ठाकूर आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले. Success of Guhagar High School in Scholarship Exam