गुहागर, ता. 08 : गोविंदा रे गोपाळा रे….च्या जय घोषात संपूर्ण गुहागर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील मोठ्या दोन दहीहंड्या शिवाजी चौक येथील गोविंदा पथकांनी फोडल्या. हा सोहळा पाहण्यासाठी गुहागर वासियानी मोठी गर्दी केली होती. Celebrating Dahi Handi festival in Guhagar


गुहागर तालुक्यातील गुहागर शहर, शृंगारतळी बाजारपेठ, आबालोली, अडुर, नरवण, पालशेत, वेलदूर व अन्य गावांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. गुहागर खालचापाट येथील गोविंदा पथकांनी अत्यंत नियोजनपूर्वक सर्व दहीहंड्या फोडण्यात आल्या. खालूबाजाच्या वाद्यावर गोविंदांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच वरचापाट, बाग, आरे याठिकाणीहि लहान मोठ्या दहीहंड्या फोडण्यात आल्या. गुहागर बाजारपेठेत शिवाजीचौक येथील गोविंदा पथकाने गुहागर आगार व गुहागर नाक्यातील दहीहंड्या उत्तम प्रकारे थर लावून फोडल्या. Celebrating Dahi Handi festival in Guhagar


दरम्यान, गेली अनेक दिवस नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. मात्र, बुधवारपासून पावसाने सुरुवात केल्याने गोविंदा पथकांनी पावसाचा आनंद लुटला. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Celebrating Dahi Handi festival in Guhagar

