रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथे अर्थसंकल्प विवेचन, आर्थिक गुन्हे व टॅक्स ऑडिट फॉर्ममधील बदल याविषयी चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून पुण्याचे वक्ते सीए वासुदेवन, सीए रेखा धामणकर, सीए धीरज दंडगवल व सीए चारुदत्त केंढे यांचे मार्गदर्शन लाभले. CA seminar at Ratnagiri


चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना सीए ब्रॅंचच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रथम सत्रात सीए वासुदेवन यांनी अर्थसंकल्पामधील बारकावे व त्यामुळे होणाऱ्या विविध बदलांचे विवेचन केले. दुसऱ्या सत्रात सीए रेखा धामणकर यांनी वाढत्या आर्थिक गुन्ह्यांचा पार्श्वभूमिवर सीएंनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात सीए धीरज दंडगवल व सीए चारुदत्त केंढे यांनी टॅक्स ऑडिट फॉर्म थ्री सीडीमध्ये झालेल्या बदलांवर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रासाठी अध्यक्ष म्हणून सीए मंदार लेले, सीए शशिकांत काळे व सीए सुनील विंचू यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला चिपळूण, खेड व दापोली येथील सीए सदस्यांसह रत्नागिरी सीए ब्रॅंचचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर व माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे उपस्थित होते. सीए स्वाती ढोल्ये व सीए अंजली फाटक यांनी सूत्रसंचालन केले. सीए सुमेध करमरकर यांनी आभार मानले. CA seminar at Ratnagiri