रत्नागिरी, ता. 01 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित स्पोर्ट्स कार्निव्हल स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ करसल्लागार दिनकर माळी यांच्यासह सीए शैलेश हळबे, एंजल ब्रोकिंगचे राजेश सोहनी आणि करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. CA Association’s Sports Carnival Prize Distribution
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धा झाल्या. स्पर्धांचे बक्षिस वितरण उत्साहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे दिनकर माळी म्हणाले की, आपण आपल्या ग्राहकांची बॅलन्सशिट ज्या प्रकारे भरतो, त्याप्रमाणे खेळ, व्यायामाची बॅलन्सशिट भरावी म्हणजे आयुष्यभर निरोगी राहून कार्यरत राहू. करसल्लागार, सीए या सर्वांनीच दररोज व्यायामासाठी वेळ द्यावा आणि कोणत्या ना कोणत्या तरी खेळात प्रावीण्य मिळावे. CA Association’s Sports Carnival Prize Distribution


बक्षीस वितरणावेळी सीए पंडित म्हणाले, आपण आपल्या करसल्लागार क्षेत्रात चांगले काम करतोय. आपण क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले तर दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतो. खेळामुळे वेगळाच आनंदाचा स्रोत निर्माण करत असतो. यातून आपल्याला उर्जा प्राप्त होत असते. आजच्या स्पोर्ट्स कार्निव्हलमुळे सर्वांना कामासाठी वर्षभर उर्जा मिळेल. विक्रमी सामने या स्पर्धेत झाले. अशाच प्रकारे सर्व उपक्रमात भाग घ्या. CA Association’s Sports Carnival Prize Distribution
स्पर्धानिहाय विजेत्यांची नावे – बुद्धिबळ विजेता वरद पेठे, उपविजेता वल्लभ महाबळ, टेबल टेनिस विजेता अक्षय प्रभुदेसाई, उपविजेता मंदार गाडगीळ. टेबल टेनिस दुहेरी- विजेते राजेश गांगण आणि अभिजित पटवर्धन, उपविजेता अमित काटे, सुधीर माउडी. कॅरम- पुरुष विजेता अतुल पंडित, उपविजेता सीए शैलेश काळे. महिला विजेती- मीनल काळे, उपविजेती स्नेहा भिंगारदिवे. कॅरम दुहेरी- विजेता अक्षय प्रभुदेसाई, अतुल पंडित, उपविजेता चिन्मय दामले, श्रीनाथ कुलकर्णी. CA Association’s Sports Carnival Prize Distribution


बॅडमिंटन (सदस्य) विजेता- राजेश सोहोनी, उपविजेता नीलेश भिंगार्डे. विद्यार्थी- विजेता वेद जागुष्टे, उपविजेता रोहित अडाव, महिला- विजेती मयुरी वैद्य, उपविजेती सांची दंडगे, पुरुष दुहेरी- विजेता राजेश सोहनी- मयुरेश जोशी, उपविजेता रोहित अडाव- पार्थ बांदिवडेकर. महिला दुहेरी- सांची दंडगे, रेणू जोशी, उपविजेती गायत्री पळसुलेदेसाई, स्वराली सागवेकर. CA Association’s Sports Carnival Prize Distribution
क्रिकेट स्पर्धा- विजेता- सीए संघ, उपविजेता एसएस २, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- राजेश सोहोनी, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अक्षय प्रभुदेसाई, मालिकावीर केतन रहाटे, सर्व सामन्यांतील सामनावीर- हर्षद पटवर्धन, संकेत पाटणकर, राजेश सोहोनी, अमित काटे, प्रसाद गोरे, सिद्धेश कनगुटकर, केतन रहाटे, अक्षय प्रभुदेसाई. पंच- भास्कर आंबेकर, केतन रहाटे, सुरेंद्र साकडे, संकेत पाटणकर, हर्षद पटवर्धन, भूषण पाटणकर. CA Association’s Sports Carnival Prize Distribution