जीवितहानी नाही, नौका मालकाचे 2 लाखाचे नुकसान
गुहागर, ता. 14 : दुरुस्ती व देखभालीसाठी नौका गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाताना लाटांच्या तडाख्यामुळे नौका बुडाली. नौकेवरील 4 ते 5 खलाशी पोहत समुद्र किनाऱ्यावर पोचले. ही घटना रविवारी (14 जुलै) सकाळी 7 वा. घडली. Boat sank on Guhagar beach
गुहागर शहरालगत असलेल्या असगोली गावात पारंपरिक पध्दतीने व्यवसाय करणारा मच्छीमार समाज रहातो. असगोलीत सुमारे 50 ते 60 मच्छीमार नौका आहेत. मात्र तेथे बंदर नाही. मासेमारी बंदीच्या काळात येथील सर्व मच्छीमार आपल्या नौका समुद्रकिनाऱ्याबाहेर आणून झाकून ठेवतात. मासेमारीवरील बंदी उठल्यावर पुन्हा या नौका समुद्रात लोटल्या जातात. त्यानंतर काही काळ समुद्रालगत मासेमारी केल्यावर ही मंडळी आपल्या नौका घेवून गुहागरच्या समुद्रावर स्मशानभुमी परिसरात येतात. या भागाला ते मंडली असे म्हणतात. Boat sank on Guhagar beach
मासेमारीचा काळ संपत आल्याने आता मच्छीमारांना समुद्राचे वेध लागु लागले आहेत. आगामी हंगामाची सुरवात करताना यांत्रिकी नौकेची डागडुजी करावी लागते. म्हणून असगोलीतील दोन बोटी आधीच मंडलीवर आणण्यात आल्या होत्या. आज अनुराग जितेंद्र जांभारकर यांच्या मालकाची शिवाय ही 1 सिलेंडर क्षमता असलेली बोट गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आणली जात होती. मंडलीच्या समोरील समुद्रात असतानाच बोट मोठ्या लाटांच्या कचाट्यात सापडली आणि पलटी झाली. बोटीवरील खलाशी समुद्रात पडले. किनारा जवळ असल्याने पोहत समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोचले. बुडालेली बोटही काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु वारा व लाटा यांच्यामुळे ते शक्य झाले नाही. या अपघाताची माहिती समजल्यावर असगोलीवासीयांनी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळावर पोचले होते. अपघातात बोटीचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नोंदले आहे. Boat sank on Guhagar beach