९ महिन्यात फक्त ५ रुग्णांची शारीरिक तपासणी
गुहागर, ता. 15 : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने एवढा मोठा निधी खर्च करून आरोग्यवर्धिनी केंद्र बांधले आहे. मात्र जर यामधून रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला येथून योग्य सेवा मिळणार नसेल तर रुग्णांच्या जीवाशी उगाचच खेळू नका. योग्य सेवा देणार नसाल तर आरोग्य केंद्राला टाळे लावा, असा इशारा गुहागर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र तळवली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल कांबळे यांना दिला. BJP taluka president Surve’s visit to Arogyavardhini center
तालुक्यातील तळवली येथे कोट्यवधी रुपये खर्चून आरोग्यवर्धिनी केंद्र बांधले आहे. मात्र मागील काही दिवस या आरोग्यवर्धिनी केंद्रातून रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी मंगळवारी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट दिली. यावेळी याठिकाणी एटीम म्हणजेच संपूर्ण बॉडी चेकअप करणारे साडेतीन लाख खर्चून मशीन बसविण्यात आले आहे. मात्र, गेल्या 9 महिन्यात केवळ 5 पेशंट या मशिनद्वारे तपासले गेले आहेत. याबाबत भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे डॉ. कांबळे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी डॉ. कांबळे यांनी मशीन चालवण्यास ऑपरेटर नाही असे सांगितले. मात्र, याबाबत कोणती लेखी तक्रार आपण जिल्ह्याला केली का? असा सवाल सुर्वे यांनी केला. आपण जबाबदार वैद्यकीय अधिकारी आहात, पण सर्वसामान्य जनतेला शासनाने दिलेल्या सुविधा देऊ शकत नसाल उपयोग काय? जमत नसेल तर घरी बसा. रुग्णांच्या जीवाशी विनाकारण खेळू नका, असा इशारा यावेळी निलेश सुर्वे यांनी दिला. BJP taluka president Surve’s visit to Arogyavardhini center
पेवे खरेकोंड येथील एका महिलेला उपचार करताना चुकीचे उपचार झाले. याबाबत देखील निलेश सुर्वे यांनी डॉ. कांबळेना त्यांची चूक निदर्शनास आणून सदर पेशंटचा उपचाराचा खर्च वाढत गेल्यास तो खर्च तुम्ही करावा, असे सांगितले. सदरील खर्च देण्यास डॉ. कांबळे यांनी मान्य केले आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातून डॉ. गरुड हे एकच स्पेशालिस्ट येतात. यावेळी देखील शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतले जातात. याबाबत रुग्णांकडून व परिसरातून चर्चा ऐकायला मिळाल्याची सुर्वे यांनी सांगत आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. यावेळी माजी जि.प. सदस्य श्री सुरेश चौगुले, भाजप तालुका सरचिटणीस सचिन ओक, भाजप जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, पेवेचे माजी उपसरपंच उमेश साळवी, गुरुनाथ कारेकर, मयुरेश भागवत व ग्रामस्थ उपस्थित होते. BJP taluka president Surve’s visit to Arogyavardhini center
गुहागर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी फक्त या तळवली उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी सरसावले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभारल्या गेलेल्या आरोग्यवर्धीनी इमारतीमध्ये लोकांना योग्य रीतीने सेवा पुरवली जाते की नाही, आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग इथे आहेत की नाही, या प्राथमिक आरोग्य केंद्राला येणारा रस्ता काय स्वरूपाचा आहे, याकडे डोळेझाकच करत आहेत. यांना त्यांची योग्य ती जागा मतपेटीतून दाखवण्याची वेळ लवकरच आली असल्याचे यावेळी भाजप तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी सांगितले. BJP taluka president Surve’s visit to Arogyavardhini center