वरवेली येथील एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली येथील जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी जिल्ह्यातील दुसरा सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा 16 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. एक मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांनी केले आहे. Bhoomipujan of solar power project
जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभा राहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या दुसऱ्या प्रकल्पासाठी गुहागर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. याचा भूमिपूजन सोहळा होत असून आमदार भास्कर जाधव हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजन साळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, सिंदूरत्न समृद्धी योजना सदस्य किरण सामंत, जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, वरवेली सरपंच नारायण आग्रे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव लाभणार आहेत. Bhoomipujan of solar power project