गुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून १० लाख रूपये निधी मंजूर झालेल्या या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ श्री विनयजी नातू यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Bhoomipujan of Sheer Cemetery Road


यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.अभय भाटकर, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण शिगवण, तालुका सरचिटणीस सचिन ओक, शीर गावचे सरपंच श्री.विजय धोपट, ग्रामसेवक श्री.देवकाते भाजपा तालुका उपाध्यक्ष संदिप साळवी, हनुमंत मोरे, शीर कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.वसंत भुवड, वसंत ठोंबरे , शीर ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच अमित साळवी, बुथ प्रमुख रमेश साळवी, शीर महालक्ष्मी देवस्थान चे गुरव नयन गुरव, मधली वाडी, देऊळवाडी, कुंभार वाडी, भुवडवाडी, तेलेवाडी या पाच वाडीतील वाडी प्रमुख अनिल बेर्डे, बाळकृष्ण ठोंबरे, रमेश साळवी, सुरेश भुवड, आत्माराम राऊत, महादेव राऊत तसेच शीर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.बाळकृष्ण शिर्के, भाजपा स्थानिक कमिटीचे सदस्य दादु गुरव, शंकर घाणेकर, सागर काटदरे, मिलिंद टक्के, निलेश ठोंबरे, महेंद्र कोस्तेकर, नितीन ठोंबरे, सतीश भुवड, महादेव साळवी, समीर साळवी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. Bhoomipujan of Sheer Cemetery Road